About us

राम कृष्ण हरी

आपल्या महाराष्ट्र भूमी मध्ये असंख्य थोर साधुसंत, ऋषीमुनी अवतीर्ण झाल्यामुळे आपला महाराष्ट्र हा संतभूमि म्हणून ओळखला जातो.
अश्या या थोर साधुसंतांचे विचार सोप्या आणि साध्या पद्धतीने जगासमोर मांडण्याकरिता आजमितीला आपले हजारो गुणीजन कीर्तनकार संगीतकार, मृदंगाचार्य,तसेच पौरोहित्य करणारे गुरुजी, कथाकार,धार्मिक यात्रा आयोजक हे सर्व गुणी मंडळी आपल्या कलेच्या माध्यमातून आपआपल्या परीने संतविचारांचा, धर्माचा त्याचप्रमाणे कलेचा प्रचार आणि प्रसार करत आहे.
तेच त्यांचे कार्य आम्ही आमच्या वेब च्या माध्यमातून जगासमोर पोहचविण्याचे काम करणार आहोत. यामुळे सर्व गुणीजन मंडळींना सोशल मीडिया च्या माध्यमातून एक स्वतंत्र व्यासपीठ तयार होईल. व त्या गुणीजनांचे कार्य व संपर्क आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला अधिक सोप्या पध्दतीने उपलब्ध होईल असा एक शुद्ध हेतु मनात ठेवून महाराष्ट्र भूमी चे आराध्य दैवत श्री विठ्ठला चरणी हा अल्पसा प्रयत्न समर्पित.

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा