फेसबुक वेबसाइट वरून आपली प्रोफाइल लिंक कॉपी करण्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करा.
१. https://www.facebook.com/ ह्या लिंक वर क्लिक करा.
२. आपल्या फेसबुक अकाउंट मध्ये लॉग इन करा.
३. तुमच्या खाजगी प्रोफाइल ची लिंक कॉपी करण्यासाठी तुमचं नाव किंवा फोटो वर क्लिक करा. जर तुम्हाला तुमच्या फेसबुक पेज ची लिंक हवी असेल तर स्टेप ६. पासून सुरुवात करा.
४. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्या अकाउंट ची लिंक कॉपी करा. कॉपी करण्यासाठी लिंक ला सिलेक्ट करा आणि माउस अथवा लॅपटॉप च्या ट्रॅकपॅड ने कॉपी करा.
५. कॉपी केलेली लिंक कीर्तनगुरू वेबसाइटच्या फेसबुक प्रोफाईल लिंक ह्या रकान्यात पेस्ट करा.
६. सर्च असं लिहिलेल्या रकान्यामध्ये आपल्या पेज चे नाव लिहा आणि शोधा. त्यानंतर आलेल्या निकालांमधून तुमच्या पेज वर क्लिक करा.
७. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्या अकाउंट ची लिंक कॉपी करा. कॉपी करण्यासाठी लिंक ला सिलेक्ट करा आणि माउस अथवा लॅपटॉप च्या ट्रॅकपॅड ने कॉपी करा.८. कॉपी केलेली लिंक कीर्तनगुरू वेबसाइटच्या फेसबुक प्रोफाईल लिंक ह्या रकान्यात पेस्ट करा.
युट्युब वेबसाइट वरून आपली प्रोफाइल लिंक कॉपी करण्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करा.
१. https://www.youtube.com/ ह्या लिंक वर क्लिक करा.
२. आपल्या युट्युब अकाउंट मध्ये लॉग इन करा.
३. वरच्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या फोटो वर क्लिक करा.
४. Your Channel वर क्लिक करा.
५. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे लिंक चा भाग कॉपी करा.
६. कॉपी केलेली लिंक कीर्तनगुरू वेबसाइटच्या युट्युब प्रोफाईल लिंक ह्या रकान्यात पेस्ट करा.